04 Oct

ADVANCE TAX अग्रिम करभरणा

अग्रिम करभरणा (ADVANCE TAX)

आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू होते. त्यानंतर करदात्याने या वर्षभरात आपल्याला किती उत्पन्न होणार आहे, निव्वळ नफा किती होणार आहे याचा अंदाज घेणे अपेक्षित असते. असा अंदाज आल्यानंतर त्यानुसार अग्रिम कर (Advance Tax) भरला जातो. करदात्याच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणावर कर आकारण्यात येणार असेल तर तो आर्थिक वर्षाच्या शेवटी ३१ मार्चला एकदम भरणे किंवा नंतर त्या करदात्याला शक्य होईलच असे नाही. हे गृहित धरूनच सरकारने अग्रिम कराचा (Advance Tax) उपाय सुचवला आहे.

आर्थिक वर्षात काहीएक उत्पन्न गृहित धरून अग्रिम कर भरला व वर्षअखेर उत्पन्न कमी झाले तर या कराचा परतावा घेता येतो. उत्पन्नाच्या अंदाजापेक्षा अधिक उत्पन्न झाले व प्राप्तिकर अधिक लागू झाला तर अग्रिम कराच्या शेवटच्या टप्प्यात तो कर भरता येतो.

अग्रिम कर ADVANCE TAX  म्हणजे काय?

तुम्हाला लागू होत असलेल्या कराच्या काही टक्के कर आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच भरणे म्हणजे अग्रिम कर होय. तुम्ही जसजसे कमवाल तसतसा कर भरा, अशी यामागची मूळ संकल्पना आहे. तुम्हाला आर्थिक वर्षात १० हजार रुपयांपेक्षा अधिक प्राप्तिकर भरावा लागणार असेल, किंवा तेवढे तुमचे करदायित्व असेल, तर अग्रिम कर भरता येईल. उत्पन्न मिळणाऱ्या आर्थिक वर्षातच हा कर भरायचा असतो.

ADVANCE TAX करभरणा दिनांक कराची रक्कम

 दिनांक एकूण अग्रिम करापैकी %

१५ जून         १५ टक्के

१५ सप्टेंबर          ४५ टक्के

१५ डिसेंबर ७५ टक्के

१५ मार्च      १०० टक्के

वेळेत नाही भरला तर दंड 

करभरना करण्याच्या तारखा चुकल्या तर  व्याजदंड आकारला जातो. कलम २३४ सी : या कलमानुसार प्रत्येक हप्त्यासाठी १% दरमहा असे ३ महिन्यांसाठी व्याज भरावे लागते. कलम २३४ बी : या कलमानुसार १ एप्रिल ते कर भरल्यापर्यंतच्या महिन्यापर्यंत १% दरमहा या दराने व्याज भरावे लागते. 


तरी अजून माहिती साठी आम्हाला लवकर संपर्क करून आपला ऍडव्हान्स टॅक्स भरून घ्यावा 


संतोष पाटील 

९७६९२०१३१६

#advancetax #incometax #tds #taxconsultant 


Find the Solution That Best Fits Your Business