06 Oct

व्यवसायातील किती पैसा उद्योजकाने स्वतःसाठी वापरावा

व्यवसायातील किती पैसा उद्योजकाने स्वतःसाठी वापरावा? 

माझ्या ८  वर्षाच्या  व्यवसायाच्या कालावधीमध्ये बहुतेक उद्योजक मला प्रश्न विचारतात की व्यवसायातून किती पैसे मी  स्वतःसाठी वापरू शकतो? 

माझे आकलन आणि अनुभव सांगतो कि जेवढा तुम्ही इनकम टॅक्स मध्ये नेट प्रॉफीट दाखवता त्याच्या ५०% तुम्ही वापरू शकता . 

केस स्टडी 

काही वेळा उद्योजकाच्या बचत खाते किंवा करंट खाते यामध्ये जास्त पैसे बॅलन्स असतात मग काही उद्योजक नेहमी व्यवसायातून पैसे काढून ते वेगवेगळ्या ठिकाणी वापरतात  जसे कि घर बांधणे (वर्षातून ७ ते ८ दिवसच ते इथे राहतात)  ,गावी शेती विकत घेणे (जिथे काही पिकत नाही),उसने पैसे देणे (पैसे परत भेटतील कि नाही त्याचा पत्ता नाही ) स्वस्त घर भेटत आहे म्हणून विकत घेणे (त्याची भविष्यात किंमत वाढतच नाही) असे भरपूर प्रकारे उद्योजक पैसा वापरतो 

परिणाम  

उद्योजकाची प्रत्येक वेळ हि नेहमी एकसारखी नसते त्यामुळे कधी कधी भांडवल नसल्यामुळे व्यवसाय बंद झालेले मी पाहिलेलं आहेत आणि अशावेळी आपण वरील जागेमध्ये वापरलेले पैसे इथे कमी परतावा देऊन जातात.   

जसे की विहिरीतून भरपूर पाणी उपसा केली कि ती सुद्धा आटते त्यामुळे 

बाजारातील पत निघून जाते 

कोणीही आपल्याला एक रुपये देत नाही 

उपाय 

नेहमी पैसे विनियोग करते वेळी Tax Experts किंवा CA  कढून सल्ला घ्या 

पैसे अशाजागी वापरा कि जिथे लगेच liquidity भेटेल 

भविष्याचा वेध घ्या.  futuristic व्यवसायामध्ये गुंतवणूक करा 

आपला जेवढा पैसा आहे तेवढाच वापरा . 

जसे की विहिरीतून भरपूर पाणी उपसा केली कि ती सुद्धा आटते त्यामुळे व्यवसायातून फायदा होत असेल तरच तरच हा पैसे वापरावा

मनावर ताबा ठेवा


आपल्याला हा लेख आवडला असल्यास आमच्या पेज ला like करा ,share करा

Alliance Tax Experts   हि गेली ८ वर्षे  टॅक्स, कंपनी नोंदणी व फायनान्स सेवा पुरविते 

अजून माहितीसाठी संपर्क करा 

संतोष पाटील ९७६९२०१३१६


Find the Solution That Best Fits Your Business